कोरोना विरुद्धच्या लढ्यात रेल्वेचाही पुढाकार; मागणीनुसार आयसोलेशन कोच उपलब्ध करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोना विरूद्धच्या या लढ्यात आता रेल्वे विभागानेही पुढाकार घेतला आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे ज्या राज्यांकडे आयसोलेशन बेड्स उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी आयसोलेशन कोच उपलब्ध करून देऊ, असे रेल्वे विभागाने सांगितले आहे.

देशात सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउनसह निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत.

परंतु तरीही दिवसेंदिवस वाढत्या रूग्णसंख्येमुळे आता रूग्णलयांमधील बेड्स देखील अपुरे पडत आहे. बेड्स अपूर्ण पडू नये त्यासाठी आता रेल्वेने पुढाकार घेतला आहे.

पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच आहेत. त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील.

अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली आहे. या प्रत्येक कोचमध्ये आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा असून, जवळपास २४ रूग्णांची एका कोचमध्ये सोय होऊ शकते.

या सर्व कोचमध्ये मिळून एकाच वेळी ३ हजार ६०० रूग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था करण्यात केली, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24