महाराष्ट्रावर आता पावसाचे संकट ! आतापर्यंत झालेत तब्बल ‘इतके’ मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचे संकट ओढावले आहे,मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत.

त्यामुळे मार्ग बंद आहेत. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यातील पूरस्थितीबाबत माहिती दिली.

त्यांनी म्हटलं की, दरड कोसळणे यावेळी खूप मोठ्या प्रमाणात घडलंय. तळीये गावातील मृत्यूचा आकडा अजून वाढू शकतो.

आतापर्यंत राज्यात एकूण १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘प्रशासकीय यंत्रणा पाऊस, अंधार, पूल पडले असताना तळीये इथे सकाळी लवकर पोहचले आणि मदत कार्याला सुरुवात केली.

आमची सगळी यंत्रणा फिल्डवर आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी काम करतायत. पुरानंतर मदत करणेही जिकरीचे आहे.

स्वच्छता करण्याचं महत्त्वाचं काम यापुढे असेल.’ अशी माहिती ही त्यांनी दिली. रत्नागिरीत वायुदलाचे हेलिकॉप्टर लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन ही दिलं.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24