अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागांत रविवारपासून पाऊस आणखी जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत प्रमुख्याने घाट विभागांत तुरळक टिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात तीव्र होण्याची आणि पश्चिम-वायव्य दिशेने येत्या 2 ते 3 दिवसात सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
परिणामी राज्यात येत्या 4, 5 दिवसांत मुंबई-ठाणेसहीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3-4 तासांत रायगड, पुणे, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर येत्या 3-4 तासात मुंबई, ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने त्याविषयीची माहिती दिलीये.