राहुरी तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-राहुरी तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ऊन सावल्यांचा खेळ सुरू असताना अखेर दुपारच्या सुमारास पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली.

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज दुपारी झालेल्या

पावसामुळे राहुरी रेल्वे स्टेशनच्या नविन झालेल्या भुयारी मार्गात जवळपास ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साठल्याने राहुरी तालुक्याच्या पुर्वभागातील वाहन चालकांना आपली वाहने या पाण्यातून नेताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या भुयारी मार्गाचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असून फक्त एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुने रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदलेली माती पुर्णपणे या भुयारात आल्याने पाणी व गाळ यातून वाहन चालकांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24