अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी अनेक भागात घुसून अनेक नागरिक रस्त्यावर आले असून मोठे नुकसान देखील झाले आहे . या पावसाचा फटका हा भाजी मार्केटला सुद्धा बसलेला आहे.
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी मार्केटमध्ये शेतमालाची चांगली आवक झाली. मात्र,पावसामुळे ग्राहक बाजारात पोहोचू शकले नाहीत . त्यामुळे शेतमाल मार्केटमध्ये तसाच पडून राहिला आहे. तसेच भाज्यांचे दर हे कमी झालेले पाहायला मिळाले.
मुंबईसह उपनगरात जाणारा भाजी पाला मार्केट बाहेर गेलाच नाही. परिणामी हा भाजीपाला आता खराब होण्याचा धोका आहे. आज नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या ३७४ गाड्या आल्या. दोन तीन दिवसांपासून भाजीपाल्याला उठावच नसल्याने १० ते १५ टक्के पालेभाज्या, फळभाज्या खराब झाल्या आहेत.
महाराष्ट्रात मान्सून पाऊस दाखल झालेला आहे. दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केटला चांगलाच फटका बसला आहे. जोरदार पावसाने सर्वत्र एक पाणी पाणी झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.
परिणामी उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकलेच नाही. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक चांगली झाली मात्र भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक नसल्यानं मालाला उठाव नाही.