अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- तालुक्याच्या परिसरात सोमवारी सायंकाळी सहा ते सव्वा सात दरम्यान दमदार पाऊस झाला गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती.
त्यामुळे शेतातील पिकांनी माना टाकल्या होत्या झालेल्या पावसामुळे उकाडा कमी होऊन पिकांना थोडेफार जीवदान मिळू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
भावली, वालदेवी, हरणबारी, नांदूरमध्यमेश्वर ही चारी धरण शंभर टक्के भरली आहेत. तर बाराहून अधिक धरणात पन्नास टक्केपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध आहे. तर आठ धरणाचा साठा २५ टक्क्यांहून कमी आहे.
नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीला ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर गंगापूर धरण समूहात ७३ टक्के जलसाठा आहे.
नागासाक्या, भोजापूर, पुणेगाव, तिसगाव धरणात सर्वात कमी जलसाठा असल्याने या भागात अधिक पावसाची प्रतीक्षा आहे. कोरोनाने आधीच हतबल झालेल्या नागरिकांना पावसाने ओढ दिली आहे.