राज कुंद्रा हे शिल्पा शेट्टीवर खर्च करतात पाण्यासारखा पैसा ; दिल्या आहेत ‘हे’ पाच अमूल्य गिफ्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. अश्लिल चित्रपट बनवून काही अॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप राज यांच्यावर आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे. आम्ही राज कुंद्राच्या प्रकरणात संबंधित गोष्टी सांगणार नाही, तर आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगू. राजने शिल्पाला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

कॉस्मोपॉलिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आपण याठिकाणी 5 सर्वात महागड्या भेटवस्तूंबद्दल पाहू –

बुर्ज खलिफा मधील फ्लॅट्स एनिवर्सरी दिनानिमित्त राज यांनी शिल्पा शेट्टी यांना खूप महागडी भेट दिली. राजने शिल्पाला दुबईतील बुर्ज खलिफा येथे एक अपार्टमेंट दिले होते. बर्‍याच अहवालात असे म्हटले होते की नंतर शिल्पाने हे अपार्टमेंट विकले होते.

यूके मधील 7 बेडरूम व्हिला राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टी यांच्यासाठी आणखी एक महाग संपत्ती विकत घेतली. त्यांनी यूकेमध्ये ‘राज महल’ नावाचा एक आलिशान 7 बेडरूमचा व्हिला विकत घेतला होता.

सी-फेसिंग विला शिल्पाचे एक स्वप्न होते, जे राजने पूर्ण केले. तिला मुंबईत सी-फेसिंग व्हिला पाहिजे होता आणि नवरा राज कुंद्राने तिची इच्छा पूर्ण केली. दोघांचे परिवार या घरात आपला जास्त वेळ घालवतात. त्यांच्या सी-फेसिंग व्हिलाचे नाव ‘किनारा’ आहे.

लग्जरी कार इतकेच नाही तर राज कुंद्राने शिल्पा शेट्टी यांना एक महागड्या कारचे गिफ्ट ही दिले आहे. यात बीएमडब्ल्यू झेड 4 चा समावेश आहे. त्याने मागील वर्षी त्याच्या महागड्या कारच्या यादीमध्ये या वाहनचा समावेश केला आहे. या महागड्या कारपैकी लॅम्बोर्गिनी देखील एक आहे .

डायमंड रिंग शिल्पा शेट्टी अनेकदा आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करते. ही अंगठी शिल्पा शेट्टीस राज कुंद्रा यांनी परिधान केली होती. 20 कॅरेटच्या रिंगची किंमत सुमारे तीन कोटी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24