अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- इतरांना देखील तुमची विकासकामे पाहुन हेवा वाटेल असे गावं घडवा. त्यासाठी काय लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिल.
सर्वप्रथम या गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन देखील दोन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला आहे.
सरपंच पदांची निवड झाल्यानंतर मनसेच्या या दोन सरपंचांनी थेट कृष्णकुंज गाठुन आपल्या नेत्यांची भेट घेऊन नवनिर्माणासाठी पाठबळ मागितले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणले की,
याच बरोबर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक पक्षाचे नेते प्रवक्ते अनिल शिदोरे यांची थेट या ग्रामपंचायतींवर मार्गदर्शक म्हणुन नियुक्ती केली व या गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा असे सांगितले.
यापुढे सतत संपर्कात रहा. तुम्हाला यापुढे विकासकामांसाठी कामासांठी काही सामाजिक संस्थांकडुन मार्गदर्शन मदत मिळवून देण्याचेही अश्वासन दिले. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.