राज ठाकरे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, तुम्ही घाबरु नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला संप आता हळूहळू चिघळू लागला आहे. नुकतेच नगर शहरातील बस कर्मचाऱ्यांच्या तारकपुर डेपो कामबंद आंदोलनाला अहमदनगर मनसेने पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतची माहिती मनसेचे नितीन भुतारे यांनी दिली आहे.

मनसेचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून वेळ आल्यास आणि सरकारने एस टी महामंडळ सरकारमध्ये विलीन केले नाहीतर  तर एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना निवेदन देऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

राज ठाकरे हे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत त्यामुळे तूम्ही घाबरु नका , संप केला तर सरकार एस टी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत असेल तर मनसे अश्या धमक्यांना घाबरत नाही.

तसेच तुम्हीही घाबरु नका सरकारला एस टी महामंडळ सरकारमध्ये विलीन मनसे करायलाच लावणार असे प्रतिपादन भुतारे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24