राजर्षी शाहू महाराज शेतकऱ्यांचे तारणकर्ते : नगराध्यक्ष आदिक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणकर्ते, बहुजनांचे पालनकर्ते होते. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला जर कुणी खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचे काम केले असेल तर ते शाहू महाराजांनीच केले, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले.

नगर पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वतीने आझाद मैदानावर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष आदिक बोलत होत्या.

यावेळी नगरसेवक रवी पाटील, प्रकाश ढोकणे, मुक्तार शहा, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, अल्तमश पटेल, विजय शिंदे, पत्रकार बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे, समित मुथ्था, निरजंन भोसले, गोपाल वायदेशकर,

सोनल मुथ्था, ग्रंथपाल स्वाती पुरे आदी उपस्थित होते. आदिक म्हणाल्या, त्या काळात छत्रपतींनी सिंचन विभाग तयार केला होता.

शेती व्यवसाय समृद्ध केला. कोल्हापुरातील राधानगरी धरण ही त्यांचीच फलश्रुती आहे. त्यांनी स्वतंत्र जननिती आखली. आणि त्याची अंमलबजावणी केली.

अहमदनगर लाईव्ह 24