अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- दिल्लीगेट येथील अपुर्वा कॉम्प्युटर्सचे संचालक राजेश रामकृष्ण आठरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. स्व.आठरे यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.
स्व.राजेश आठरे हे गजराज ड्रायक्लिनर्सचे संचालक सुरेश चव्हाण यांचे जावई तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षा तसेच अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालिका रेश्मा आठरे यांचे पती होत.
स्व.आठरे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अपूर्वा काँम्प्युटर्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोर-गरिब विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले.
मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार निर्माण केला होता. सामाजिक कार्यात ते सक्रीय सहभाग घेत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.