माजी पंतप्रधान राजीव गांधी) यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेला व शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारिवलन याची सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तब्बल ३१ तुरुंगात राहिल्यानंतर ए.जी.पेरारिवलन याची आता सुटका होणार आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरल्यानतंर फाशीची शिक्षा, दया याचिकेवर ११ वर्षांचा विलंब, फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर आणि आता सुटकेचा निर्णय झाला. तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूर मध्ये २१ मे १९९१ रोजी आत्मघातकी हल्ला करुन स्फोट घटवण्यात आला होता, त्या हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.
आत्मघातकी स्फोट घडवणारी महिला धनू, याशिवाय पेरारिवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चौघांना मे १९९९ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. दोषींनी दाखल केलेल्या दया याचिकेवर ११ वर्ष निर्णय न घेण्यात आल्याने फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते.
दोषींची ३० वर्ष शिक्षा भोगल्यानं सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ती फाईल राष्ट्रपतींना पाठवली होती. जन्मठेपेची शिक्षा १६ वर्ष, ३० वर्ष किंवा आजन्म कारावास अशी असते. यामध्ये ती तीस वर्षे गृहित धरून आरोपीची सुटका करण्याचा आदेश देण्यात आला.