अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा गुरु माऊली प्राथमिक शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी बाळासाहेब सरोदे तर कार्याध्यक्षपदी अजय लगड यांची निवड करण्यात आली.

प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप यांच्यासह जिल्हाभरातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा गुरुमाऊली मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : जिल्हाध्यक्ष- श्री राजकुमार साळवे (राहुरी), कार्यकारी अध्यक्ष – बाळासाहेब सरोदे (श्रीरामपूर),कार्याध्यक्ष – अजय लगड (श्रीगोंदा), सरचिटणीस – विजय ठाणगे (नगर), कोषाध्यक्ष -ना.ची. शिंदे (शेवगाव), संजय मुखेकर (अकोले),

कार्या.चिटणीस – अनिल घोलप (राहता), संदीप ठाणगे (कर्जत), उत्तर जिल्हा प्रमुख – अरविंद घोडके (नेवासा), दक्षिण जिल्हा प्रमुख – विजय नरवडे (पाथर्डी), प्रसिद्धी प्रमुख – विठ्ठल काकडे (राहुरी), उपाध्यक्ष – बाळासाहेब जर्‍हाड (पारनेर), महेश फुंदे ( पाथर्डी), कनलाल जवरे (शेवगाव),

एकनाथ लोंढे (संगमनेर), बबनराव बोर्डे (कोपरगाव), संपत तरटे (श्रीगोंदा), बबन गव्हाणे (जामखेड), मच्छिंद्र सुकटे (अकोले), सहचिटणीस – दिपक शिंदे (श्रीरामपूर),

रवी कडूस (श्रीगोंदा), अरुण कोरडे (पारनेर), रविकिरण साळवे (राहुरी), रमेश दहिफळे (पाथर्डी), सल्लागार – दशरथ हजारे (जामखेड), बापू सोनवणे (नेवासा), राजू सकट (कर्जत), भास्कर आंबरे (अकोले). सदस्य – संजय हजारे (जामखेड), शिरीष पाटोळे (नेवासा), सिताराम चौखंडे (अकोले).