ताज्या बातम्या

Rakesh Jhunjhunwala : बिग बुलच्या 46000 कोटींच्या साम्राज्याचा कोण असणार वारसदार? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. नुकतीच त्यांनी अकासा एअरलाईन (Akasa Airline) सुरु केली होती.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 46000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे (Investment) काय होणार? असा सवाल तयार झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले ही संपत्ती सांभाळणार आहे.

त्यांच्या भावाचे दुबईहून (Dubai) आगमन झाल्यानंतर मुंबईतील (Mumbai) बाणगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झुनझुनवाला यांच्या जाण्याने त्यांच्या विमान कंपनी (Airline) आणि इतर व्यवसायासमोर आता मोठी आव्हाने (Challenges)  निर्माण होऊ शकतात.

गुंतवणुकदार (Investors) असण्यासोबतच झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष होते.

बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, व्हाईसरॉय सिक्युरिटी लिमिटेड आणि डायरेक्टर टॉप हॉटेल लिमिटेडचे ​​बोर्ड सोबतच राकेश आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमधील एकूण भागीदारी 40 टक्क्यांहून अधिक आहे.

ते स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रवर्तक देखील आहेत.जून तिमाहीत, त्यात त्यांची हिस्सेदारी सुमारे 17.46% होती.राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात.राकेश हे देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.

त्यांनी 1985 मध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली.त्यावेळी बीएसईचा निर्देशांक 150 वर होता.पत्नी रेखा यांच्या सांगण्यावरून त्यांनी 2003 मध्ये स्वत:ची स्टॉक ट्रेडिंग फर्म रेअर एंटरप्रायजेसची स्थापना केली.

Ahmednagarlive24 Office