राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 10 मिनिटांत 186 कोटींची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत बाजार उघडण्याच्या 10 मिनिटांत 186 कोटी रुपयांची वाढ झाली. टाटा समूहाच्या टायटनच्या शेअर्सनं आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सने त्यांना फायदा मिळवून दिला.

टायटन स्टॉकची किंमत मंगळवारी सकाळी 9:25 वाजता प्रति शेअर 2435 रुपयांवर गेली होती. शेअर बाजार उघडल्यानंतर 10 मिनिटांत प्रति शेअर किंमत 37 रुपयांनी वाढली.

तर अखेरच्या सत्रात टायटनचे शेअर्स 2499.60 रुपयांवर बंद झाले. याच प्रकारे झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील टाटा मोटर्सचे शेअरची किंमत सुरूवातीच्या सत्रात वाढली.

हा शेअर सकाळच्या सत्रात 9.25 वाजता 471.25 रुपयांवर पोहोचला. तर बाजार बंद होताना या शेअरची किंमत 503 रुपयांवर पोहोचली.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,57,10,395 शेअर्स आहेत, तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेअर्स आहेत.

याचा अर्थ राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत 5.09 टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचा कंपनीमध्ये 1.18 टक्के हिस्सा आहे.

मंगळवारी बाजार उघडल्यानंतर ते बंद होण्याच्या कालावधीत टायटनच्या शेअरचा विचार केला तर झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अंदाजे 170 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली. तर टाटा मोटर्सच्या शेअरनं त्यांच्या संपत्तीत एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ केली.