Raksha Bandhan Muhurt : आज ही आहे राखी बांधण्याची योग्य वेळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- हिंदू पंचांगानुसार, उद्या 22 ऑगस्ट श्रावण महिन्याची पौर्णिमेची तिथी आहे. श्रावण पौर्णिमेची तारीख हिंदू धर्मात खूप महत्वाची आहे. या तारखेला भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण देशभरात साजरा केला जातो.

बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यंदा 50 वर्षानंतर चार विशेष योग आले आहेत. अशा परिस्थितीत या रक्षाबंधनाचे महत्त्व अतुलनीय आहे.

म्हणून, बहिणींनी भावांना राखी बांधण्यापूर्वी हे काम केले पाहिजे. या पोर्णिमेला राखी पोर्णिमा असे म्हटले जाते. यावर्षी हा सण २२ ऑगस्ट २०२१ला साजरा केला जात आहे. जाणून घ्या या सणाबाबत महत्त्त्वाचे असे काही…

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पोर्णिमा तिथी प्रारंभ :- २१ ऑगस्ट २०२१ला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते २२ ऑगस्ट २०२१च्या संध्या ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. पुजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त १ वाजून ४२ मिनिटांनी दुपारी ते संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल. या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली राहणार नाही. बहीण सूर्योदयानंतर कधीही भावांना राखी बांधू शकतात. पण त्याआधी भगिनींनी भगवंताला राखी अर्पण करावी.

हिंदू धर्मग्रंथानुसार सर्वप्रथम देवतांना राखी बांधून नैवेद्य दाखवावा. नंतर भावांना राखी बांधून घ्या. ही धार्मिक श्रद्धा आहे की असे केल्याने देव प्रसन्न होतो आणि बहिणींना अपेक्षित वरदान देतो आणि भावांचे घर संपत्तीने भरते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे. त्यानंतर भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान श्री कृष्ण, भगवान श्री राम, भगवान हनुमान आणि तुमचा ईष्ट देव अशा कोणत्याही देवतांना राखी अर्पण करा, त्यानंतर भावांना राखी बांधा.

अहमदनगर लाईव्ह 24