आज रक्षा बंंधन ! जाणून घ्या दिवशी राखी बांधण्याचा मुहुर्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- देशभरात आज रक्षा बंंधनाचा पवित्र सण साजरा होणार आहे. श्रावण महिना सुरु होताच सुरु होणार्‍या सणांंच्या मंदियाळीतील हा दुसरा मोठा सण आहे. भावाबहिणीच्या प्रेमाचं, आपुलकीचं, नातं साजरं करण्यासाठी हा दिवस असतो.

लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा रक्षाबंधनाचा सण देशभरात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. तर पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळीबांधव समुद्राची पूजा करत असल्याचे मानले जाते. याशिवाय समुद्राला नारळ अर्पण करण्याची देखील प्रथा आहे.

मागील वर्षी करोनामुळे रक्षाबंधन साजरे करण्यावर अधिक निर्बंध होते. वास्तविक हा संपुर्ण दिवस खास असतो पण त्यातही राखी बांंधताना मुहुर्त पाहिल्यास सुवर्ण योग आपण जुळवुन आणु शकता. यासाठीच यंदाच्या रक्षा बंंधन दिनी राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहुर्त आहे हे जाणुन घेउयात.

रक्षाबंधन 2021 : राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त :-

शुभ वेळ : 22 ऑगस्ट, रविवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत

राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ उत्तम : दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपासून ते 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत

उजव्या हातात बांधा रक्षेचा धागा :- लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी औक्षणाचं ताट सजवा. पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढा. भावाला पाटावर बसवून त्याचं औक्षण करा.

त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवा. तसेच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घ्या. राखी बांधणं म्हणजे, वैदिक पद्धतीत याला मणीबंधनाचे प्रतिक म्हणतात. त्यानंतर भाऊ स्वइच्छेने बहिणीला भेटवस्तू देतो.

अहमदनगर लाईव्ह 24