ताज्या बातम्या

आज रक्षाबंधन, मुहूर्त कधीचा? पंचांगकर्ते दाते म्हणाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Rakshabandhan: आज राखीपौर्मिमा आहे. बहिणीने भावाला राखी बांधण्याचा हा सण. राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता? यासंबंधी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

काहींच्या मते दिवसभरात नव्हे तर रात्री चांगला मुहूर्त आहे. मात्र, यासंबंधी पंचागकर्ते मोहन दाते यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

दाते यांनी सांगितले की, ‘या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते. यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. हा सामाजिक उत्सव आहे.

त्यामुळे दिवसभरात केव्हाही राखी बांधता येऊ शकते.’ मुहूर्ताची चर्चा का सुरू आहे? या बद्दल दाते म्हणाले, ‘पूर्वी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एढाच मर्यादित नव्हता.

त्याकाळी राजाला रक्षाबंधन केले जात होते. रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार केले जायचे. ते राजाला बांधले जायचे. अशा प्रकारचा विधी करण्यासाठी तेव्हा मुहूर्त पाहिला जात असे.

आता रक्षाबंधन हे इतर विधींप्रमाणे नाही, तर तो एक सामाजिक उत्सव आहे. त्यासाठी मुहूर्ताची गरज नसते.

त्यामुळे आम्ही पंचांगातही रक्षाबंधनाचा मुहूर्त दिलेला नाही. नागरिकांनी दिवसभरात केव्हाही रक्षाबंधन करून आनंद साजरा करावा,’ असे आवाहन दाते यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office