राम शिंदे म्हणतात: ‘त्यांच्या’मुळेच कर्जत तालुका कुकडीच्या पाण्यापासून वंचित!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा नाही. कारण जनता कोरोनाच्या अत्यंत गंभीर संकटाचा सामना करत आहे. परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी देखील जनतेची अडवणूक करु नये.

असे मत माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त करत आज कुकडीच्या पाणीपासून तालुका वंचित राहिला असून त्यास आ.रोहित पवार हेच जबाबदार असल्याची घणाघाती टिका केली. माजी मंत्री प्रा.राम शिंदे  यांनी  कर्जत तालुक्यातील कुकडी पट्ट्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

कुकडीचे आवर्तन ९ मे रोजी सुटनार असल्याचे जाहीर झाल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाने त्यास स्थगिती मिळाली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या काळात केलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामामुळे  तालुक्यात आज पर्यंत पाणी उपलब्ध होते.

त्यामुळे प्रशासनाने ही दुष्काळी नियोजन केले नाही. तालुक्यात कुठे ही टँकरचे नियोजन केले नाही, त्यामुळे यापुढे नियोजन करून वेळेवर शेतकऱ्यांना पाणी मिळू शकणार नाही. कुकडीच्या आवर्तनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे पाप राज्य सरकार व आमदार रोहित पवार करीत आहेत.

असा आरोप माजीमंत्री राम शिंदे यांनी केला. कोरोनाचा भयंकर काळ सुरू असताना या काळात चुकूनही राजकारण करायचे नाही. परंतु कोरोना महामारीचा काळ व त्यात अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जात असताना

हक्काचे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना मिळत नसेल तर  सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी राजकारण करीत असल्याचे ते म्हणाले रब्बी हंगामातील सहा टीएमसी पाणी शिल्लक असताना सुद्धा मे महिन्यात देखील उन्हाळी आवर्तन सुटत नाही.

म्हणजे पाण्यावाचून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे, असे म्हणत विद्यमान आ.पवार यांनी तालुक्याला वाऱ्यावर सोडले असल्याची टीका केली. पाणी असताना पाणी न देणे हे पाप आहे. न्यायालयाचा स्टे मिळणे ही कुकडीच्या इतिहासातील पहिली घटना आहे.

आपल्या काळात कुकडीचे पाणी वेळेत व कुठलेही राजकारण न करता येत होते, यासाठी आपल्याला पुणे जिल्ह्यातील नेत्यांशी लढावे लागत होते.

आता मात्र  तालुक्यासाठी कुकडीच्या पाणी प्रश्नांकडे पाहण्यास विद्यमान आमदारांना वेळ नाही. कारण त्यांना या ना त्या कारणाने राज्यात फिरायचे आहे व कारण शोधून केंद्रावर टीका करत राजकारण करायचे आहे अशी जोरदार टीका ही प्रा.शिंदे यांनी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24