पदवीधर शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राम वाकचौरे यांची निवड सातपुते कार्यकारी अध्यक्ष तर तांबे कार्याध्यक्ष

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रणित अहमदनगर जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अकोल्याचे तरुण तडफदार आणि संघटक नेते राम वाकचौरे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून जामखेडचे मुकुंदराज सातपुते तर कार्याध्यक्ष म्हणून नेवाशाचे भास्कर तांबे तसेच सरचिटणीस म्हणून कर्जतचे राजेंद्र माळवदकर आणि कोषाध्यक्ष म्हणून नगरचे बाळासाहेब चाबुकस्वार यांची ही निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाशिक विभागीय सरचिटणीस सत्यवान मेहेर यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण , चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे, महिला आघाडीच्या राज्य प्रतिनिधी विद्युल्लता आढाव आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर पदवीधर विभागाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – राम वाकचौरे (अकोले), कार्यकारी अध्यक्ष- मुकुंदराज सातपुते (जामखेड), कार्याध्यक्ष – भास्कर तांबे (नेवासा), सरचिटणीस – राजेंद्र माळवदकर (कर्जत), कोषाध्यक्ष – बाळासाहेब चाबुकस्वार (नगर), कार्यालयीन चिटणीस – बाळासाहेब गुंजाळ (कोपरगाव), वसंत शिंदे (नगर),

सहचिटणीस – मच्छिंद्र पटारे (राहुरी), श्रीमती.स्नेहलता सुंबरे (पारनेर), शिवाजी फुंदे (पाथर्डी), उपाध्यक्ष – बाळासाहेब फटांगडे (पारनेर), बाजीराव पाचरणे (श्रीगोंदा), रामदास अडसूळ (कर्जत), बाबासाहेब केदार (शेवगाव), सल्लागार -शहाजी जगताप (जामखेड), नारायण सुपेकर (संगमनेर), कैलास निकम (नेवासा), अरुण फंड (श्रीगोंदा). विस्तारित कार्यकारिणीमध्ये तालुका प्रतिनिधींची नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत.

जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम करू . या कामी जिल्ह्यातील सर्व पदवीधर शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन नूतन अध्यक्ष राम वाकचौरे यांनी केले आहे. बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघ भक्कम रीत्या कार्यरत आहे.

जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये शाखा असणारी आणि जिल्हा संघाची स्वतंत्र कार्यकारिणी असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव संघटना आहे. इतर संघटनांना आपल्या अनेक तालुक्यांमध्ये कार्यकारिणी साठी माणसं सुद्धा मिळत नाही तरी त्या मोठ्या वल्गना करतात ही हास्यास्पद बाब आहे, असे ही ते म्हणाले. नूतन कार्यकारिणीचे जिल्हाभरातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!