अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपकडून गोविल यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अरुण गोविल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अरुण गोविल हे बंगाल निवडणुकीत भाजपाच्या बाजूने प्रचार करणार असून गोविल बंगालमध्ये साधारण १०० सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
अरुण गोविल यांनी भाजपमध्ये केला तेव्हा भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह उपस्थित होते. अरुण गोविल यावेळी म्हणाले, याआधी मला राजकारण कळत नव्हते.
पण मला जे वाटते ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचे आहे आणि भाजप हा सगळ्यात चांगला पर्याय असल्याचे म्हणतानाच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.
मी पहिल्यांदा असे पाहिले की जय श्री राम या घोषणेची ममता बॅनर्जी यांना अॅलर्जी झाली. जय श्रीराम फक्त एक घोषणा नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
कोण आहेत अरुण गोविल :- अरूण गोविल असे अभिनेते आहे, हे ९० च्या दशकात छोट्या पडद्यावरील रामायण या मालिकेतून प्रसिद्ध झाले होते.
रामानंद सागर यांच्या ९० च्या दशकात दाखवली जाणारी रामायण ही मालिका आणि त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या धार्मिक मालिकेत भगवान रामाची भूमिका अरूण गोविल यांनी साकारून चाहत्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.