अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-देशात सध्या कोरोनाचे हाहाकार उडवला असून विविध राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचा उद्रेक होत असून तिथं कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेमडेसिवीर औषधांची कमतरता भासत असून त्याचा काळाबाजार सुरु असल्याचं चित्र निर्माण झालंय. दिल्लीत रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचं अनेक घटनांमधून स्पष्ट होतंय.
अवैधरित्या रेमडेसिवीर इंजेक्शन बाळगल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. या तरुणाकडून शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शन्स जप्त करण्यात आलीयत. ही इंजेक्शन त्याने कुठून मिळवली, याची पोलीस चौकशी करत आहेत.
नोएडा सेक्टर २० चे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच याबाबतची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हरयाणाच्या पंचकुलातून नुकतंच पोलिसांनी एका मेडिकल दुकान मालकाला अटक केली होती.
या इसम स्वतःच्या दुकानातूनच इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचं दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्याच्याकडून १८ इंजेक्शन्स जप्त करण्यात आली होती.