अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील पारगांव सुद्रीक येथील रहिवासी रमेश रामदास बैरागी गुरुजी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.
मृत्यू समयी ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर नगरमधील नालेगांव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्व.रमेश बैरागी यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.
गावात त्यांनी स्व:खर्चाने श्रीराम मंदिर उभारले. सामाजिक कार्यात ते हिरारीने भाग घेत. धार्मिक कार्य, सप्ताह, राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी,
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे विविध उपक्रम त्यांनी गावात राबविले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशितून हळहळ व्यक्त होत आहे.