राणेंचा सवाल, मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री, तथा भाजपा नेते खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. सरकारने लागू केलेले निर्बंधही काही शिथिल केले आहेत.

तर, काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मात्र अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. यावरून राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ दिली.

त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीत १५६१ मृत्यू दिले. याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. या अगोदर बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नारायण राणेंची भेट घेतली होती,

तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील कोरोना परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, राणेंनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24