अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर शहरात सध्या खंडणीखोरांची प्रचंड दहशत वाढली आहे. या दहशतीमुळे व्यवसायिक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण असून, हे खंडणीखोर दिवसाढवळ्या व्यवसायिकांना लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहेत.
शहरातील एका प्रॉपर्टी व्यावसायिकास नुकताच खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. चंकी दादा व वडा भाई अशी त्या खंडणीखोरांची नावे असून, या दोघांनी त्या व्यावसायिकास पाच लाखा रुपयांची खंडणी मागितली असल्याचा केला आहे.
या दोघां खंडणी खोरांविरोधात अहमदनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र या दोघांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
सदर गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी अरबाज सय्यद हे महानगरपालिकेत कामानिमित्त गेले असता, त्यांना तेथे गाठून तु आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर तुला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटने संदर्भात त्या प्रॉपर्टी व्यवसायिकाने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेसंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेवटी त्यास न्यायालयाचे दार ठोठावले लागले.
या घटने संदर्भात न्यायालयाने त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपींना या संदर्भात पोलीस प्रशासन आता काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.