अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी येथील तरूणाची नेवासा येथील तरूणीबरोबर दोन वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर तरूणाने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला.
नंतर दुसर्याच तरूणीबरोबर लग्न केले. त्यामुळे फसवणूक करून बलात्कार झालेल्या नेवासा येथील तरूणीने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय. नेवासा तालुक्यातील एक २१ वर्षीय तरूणी शिक्षण घेत आहे.
सुमारे अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तरूणीची ओळख राहुरी येथील मोमीन आखाडा परिसरात राहणारा संदिप सुभाष माळी या तरूणीबरोबर झाली. दोघांमध्ये घनिष्ठ ओळख होऊन चॅटिंग चालू झाली.
नंतर भेटीगाठी सुरू झाल्या. अरोपी संदिप सुभाष माळी या तरूणाने त्या तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून १० मार्च २०१९ रोजी राहुरी तालुक्यातील डोंगरगण परिसरात पहिल्यांदा बलात्कार केला.
त्यानंतर मोमीन आखाडा, राहुरी शहरातील हाॅटेल लाॅजवरव अन्य ठिकाणी अनेक वेळेस बलात्कार केला. काही दिवसांपूर्वी त्याने त्या तरूणीला लग्नाला साफ नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या नेवासा तालुक्यातील तरूणीने आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
आणि सर्व घटना कथन केली. त्या तरूणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी संदिप सुभाष माळी राहणार मोमीन आखाडा ता. राहुरी.
याच्या विरोधात वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.