अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील, पठार भागांमध्ये पुन्हा करोणा महामारीचा उद्रेक बघायला मिळत आहे.
मागील आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी साकुर जिल्हा परिषद गट दहा दिवसासाठी लोक डाऊन घोषित केला होता काही अंशी करोणा महामारीचे पेशंट कमी झाले पण तरी ही साकुर पठार भागातील काही ग्रामपंचायती हद्दीत करोणा महामारी बघायला मिळत आहे
परिणामी मांडवे बु व जांबुत या ग्रामपंचायतीने आठ दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे १९/८ ते २५/८ पर्यत या दोन्ही ग्रामपंचायतीतील हद्दीतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत सर्व लोकांनी जनता कर्फ्यू सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती संरपचानी केली आहे..