अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- शिर्डी शहरातील पानमळा परिसरात दुर्मिळ खंड्या पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. हा पक्षी आढळून आला त्याठिकाणी राहणाऱ्या एकाने याबाबत राहाता व कोपरगाव तालुक्यातील वनविभाग खात्याला याची माहिती दिली.
वन कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी यर्त या पक्षाची पाहणी केली आणि उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्नालयात हलविण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी शहरातील पानमळा परिसरात दुर्मिळ खंड्या पक्षी जखमी अवस्थेत विलास लासुरे यांच्या परिवारातील सदस्यांना मिळून आला.
यावेळी त्या पक्षाच्या जवळ गेले असता हा पक्षी गंभीर जखमी असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. तातडीनेे जखमी पक्षाला उचलून व्यवस्थित ठिकाणी ठेवत त्याला धान्य व पाणी दिले.
या पक्षाचे खाद्य छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक असल्याने त्यांच्या समोर ठेवलेले कुठलेही खाद्य त्याने खाल्ले नाही. त्यानंतर त्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले.
दरम्यान अशा घटना घडल्या असता वनविभागाचे कर्मचारी नागरिकांचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.