प्रवरा नदीच्या परिसरात आढळून आला दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भंडारदरा जलाशय जवळील प्रवरा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर असण्याचा तज्ज्ञाचा अंदाज आहे. कळसूबाई परिसरातही पक्षी निरीक्षकांना हा पक्षी आढळल्याची नोंद आहे.

स्वर्गीय नर्तक पक्ष्याचे वर्णन आपण जाणून घेऊ, या पक्षाच्या दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात तर दुसरी जात श्रीलंकेत आढळते. नराला लांब शेपूट असते,

त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर पांढऱ्या रंगाचा असतो, तर लहान नर आणि मादी लाल रंगाची असते. स्वर्गीय नर्तकाची मान व चोचीकाडील भाग काळपट गडद रंगाचा असतो.

डोक्यावर लहान तुरा, दोन पिसाची दीड फुट लांब असणारी शेपटी यामुळे त्याचे सौदर्य अधिक खुलून दिसते. स्वर्गीय नर्तकचा वावर मुख्यतः उत्तर प्रदेश मधील जंगलात आढळतो. मध्य प्रदेशचा ‘राज्य पक्षी’ म्हणून स्वर्गीय नर्तकची ओळख आहे.

या पक्ष्याचे लहान किडे, अळ्या हा प्रमुख आहार आहे .हा पक्षी परीसरातही पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे हवेत उडत असताना लांबदार शेपटी असलेला हा पक्षी पंतगासारखा दिसत असल्याने जणु काही नाचतच असल्याचा भास होतो. दाट झाडीत रहायला आवडते .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24