ताज्या बातम्या

रश्मी शुक्‍ला यांना क्लीनचिट, टॅपिंग प्रकणारणी पोलिसांचा अहवाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकणारणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता त्यांना या प्रकरणी त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट (सी समरी अहवाल) पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

त्यामुळे आता न्यायालयाची परवानगी मिळताच, या प्रकरणाची फाइल कायमची बंद होणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी रश्‍मी शुक्‍ला यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घटनेमुळे मोठे राजकीय वादंग निर्माण झाले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सरू होता.

या प्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्‍लेषणविभागाचे पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांचीचौकशी करण्यात आली होती. शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदा टॅप करून त्या फोन मधील संभाषण भाजप सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालिन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला होता.

Ahmednagarlive24 Office