अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शासनाने शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करावे. या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले.
नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेकडून विविध मागण्या करण्यात आल्या. वाढीव एच.पी.चे बिल दुरुस्त करून नंतरच बिलाची आकारणी करावी,
वीज कायदा २००३ नुसार शेतकऱ्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, शेतीसाठी दिवसा वीज, रोहित्र दुरुस्ती, विद्युत वाहिन्या व खांबांची दुरुस्ती करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी स्वीकारले.
यावेळी भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पटारे यांनी सरकारवर टीका करत निवडणुकीच्या वेळेस खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.