Ration Card : सरकारने केला रेशनबाबत धक्कादायक खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card : देशातील लाखो लोकांकडे रेशन कार्ड आहे. अनेकजण सरकारकडून देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही देखील केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात असणाऱ्या मोफत रेशन योजनेचा किंवा सबसिडी रेशन योजनेचा लाभ घेत असाल ही बातमी तुमच्या कामाची आहे.

कारण सरकारने रेशनबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सरकार आता मिळणाऱ्या रेशनमधील भेसळ रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलत आहे. सरकारने भेसळ करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

रेशनच्या तपासणीदरम्यान माहिती आली समोर

केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारे रेशनचे धान्य विविध अधिकाऱ्यांच्या नजरेतून जात आहे असे या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे. शासनाकडून रेशन दुकानांपर्यंत पोहोचल्या जाणाऱ्या रेशनचा दर्जा चांगला असून या दुकानांवर उपलब्ध असणाऱ्या रेशनची अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तपासणी केली असता, दुकानदारांकडून त्या वस्तूंमध्ये भेसळ करण्यात येत आहे असे आढळून आले आहे.

यूपीमधून घेतले 26934 रेशनचे नमुने

केंद्र सरकारच्या मतानुसार सर्वात जास्त 26934 रेशनचे नमुने यूपीमधून घेतले आहे. यामध्ये 13 हजारांपेक्षा जास्त नमुने निकामी आढळले आहे. यूपी सरकारने दिलेल्या माहितीत असे सांगितले आहे की अशा 118 लोकांना दंड आणि तुरुंगात पाठवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडूमधून 19858 नमुने घेतले आहे. ज्यात 1033 नमुने अयशस्वी ठरले आहेत. तसेच राजस्थानमध्ये 16022 नमुने घेतले आहेत, याठिकाणी एकूण 800 नमुने निकामी झाले.

मध्य प्रदेशात 15355 तर महाराष्ट्रात 13118 नमुने घेतले गेले आहेत. याबाबत या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, केंद्राकडून मिळणारे रेशन राज्य सरकारद्वारे वितरित करण्यात येते. नागरिकांना चांगले रेशन मिळावे यासाठी राज्य सरकार सतत नमुने घेत असते. या नमुन्यांचा निकाल समाधानकारक आला नाही तर या आरोपींवर कारवाई करण्यात येते.