Ration Card : रेशनकार्डधारकांनो तुम्ही तर नाहीत ना ‘या’ यादीत? जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल

देशातील करोडो लोक सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत धान्य घेत आहेत. जर तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे.

Ration Card : सरकार आता 2023 मध्येही देशातील नागरिकांना मोफत रेशन देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत यावर्षी मोफत रेशनसाठी एक वर्ष वाढवले ​​आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड गरजेचे आहे. इतकेच नाही तर रेशनकार्ड हे आपल्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु, आता काही लोकांना त्यांचे रेशन कार्ड सरेंडर करावे लागणार आहे. सरकारकडून याबाबत अगोदरच माहिती दिली होती. जर त्यांनी रेशन कार्ड सरेंडर केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते. काय आहे हे नेमके प्रकरण जाणून घ्या.

Advertisement

काय आहे रेशन कार्डचे फायदे ?

खरं तर शिधापत्रिकाधारकाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार गहू, तांदूळ, डाळी, मीठ इत्यादी धान्य मोफत देण्यात येते. परंतु त्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेवर आहे. तसेच पत्त्याचा पुरावा आणि इतर कोणतेही कागदपत्र बनवण्यासाठी रेशनकार्ड खूप गरजेचे आहे.

Advertisement

आता या लोकांना रेशन कार्ड सरेंडर करावे लागणार

अनेकजण खूप श्रीमंत असूनही चुकीच्या पद्धतीने रेशनकार्ड बनवून याचा गैरफायदा घेत आहेत. नियमानुसार असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा व्यक्तीने तात्काळ त्यांचे रेशनकार्ड सरेंडर करावे.

Advertisement

जे गरीब आणि गरजू पात्र लोक आहेत त्यांनाच शिधापत्रिका बनवता येणार आहे, असे सरकारकडून अगोदर स्पष्ट केले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने बनवलेले रेशनकार्ड काढले असेल आणि तो चुकून पकडला गेला तर त्याच्यावर कारवाई होऊन त्याला दंड होऊ शकतो.

हे लोक आहेत अपात्र

Advertisement
  • तुमच्या घरात कार, ट्रॅक्टर आणि एसी असेल
  • जर तुमचे घर 100 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर
  • जर तुम्ही करदाता असाल तर
  • ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती ज्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर
  • शहरी भागात राहणारी अशी व्यक्ती ज्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही पात्र नाहीत.