Ration Card News : कामाची बातमी! रेशन कार्ड हरवले किंवा फाटले तर टेन्शन घेऊ नका, या सोप्या पद्धतीने सहज पुन्हा येईल बनवता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा देशातील लाखो नागरिक फायदा घेत आहेत. या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना कमी दरात धान्य दिले जाते.

केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून देशातील रेशनकार्ड धारकांना मोफत धन्य वाटप केले जात आहे. या मोफत धान्य योजनेची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना २०२४ पर्यंत मोफत धान्य वाटप केले जात आहे.

रेशन कराड बनवण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे महत्वाची आहेत. त्यामुळे नवीन शिधापत्रिका बनवताना तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही नवीन रेशनकार्ड बनवू शकता.

बीपीएल, एपीएल अशा विविध प्रकारची शिधापत्रिका सरकारद्वारे बनविली जातात. मात्र अनेकदा नागरिकांना रेशन कार्डबाबत समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे नागरिकांना रेशन घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

रेशन कार्ड धारकांकडून रेशन कार्ड फाटते किंवा हरवते. अशा वेळी शिधापत्रिका धारकांना काय करावे हे समजत नाही. त्यामुळे जर तुमचेही रेशन कार्ड हरवले किंवा फाटले तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही सहज डुप्लिकेट रेशनकार्ड बनवू शकता.

डुप्लिकेट रेशन कार्ड मिळविण्याचे हे आहेत सोपे मार्ग

स्टेप 1

जर तुमच्याकडूनही तुमचे मूळ रेशनकार्ड हरवले किंवा फाटले असेल तर तुम्ही डुप्लिकेट रेशनकार्डसाठी देखील अर्ज करू शकता. राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट तुम्ही सहज अर्ज करू शकता.

स्टेप 2

राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट रेशनकार्ड मिळण्याची लिंक दिसेल.
या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
मग तुमच्या समोर एक फॉर्म उघडलेला दिसेल

स्टेप 3

तुमच्यासमोर उघडलेला फॉर्म तुम्हाला भरवा लागेल.
यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. रेशन कार्ड क्रमांक आणि इतर माहिती तुम्हाला भरावी लागेल.
जर फॉर्म भरला असेल तर त्यासोबत तुम्हाला येथे मागवलेल्या कागदपत्रांची प्रत अपलोड करावी लागेल.

स्टेप 4

यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमचे डुप्लिकेट रेशनकार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
काही दिवसांनी तुम्हाला डुप्लिकेट रेशनकार्ड दिले जाते.