Ration Card News : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील गरीब कुटुंबासाठी रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील करोडो गरीब कुटुंबाना होत आहे. मात्र रेशन कार्ड बाबत सरकारकडून अनेक नवीन नियम जारी केले जात आहेत.
कोरोना काळापासून देशातील रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच मोफत धान्य वाटप योजना २०२४ पर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच रेशनकार्डबाबत दिवसेंदिवस अनेक नवीन नियम जारी केले जात आहेत. त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात आलेले नवीन नियम लाभार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला देखील रेशनचा लाभ मिळणार नाही.
शिधापत्रिका धारकांसाठी सरकारकडून एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये सरकारकडून शिधापत्रिका धारकांना eKYC करणे बंधनकारक केले आहे. eKYC करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती मात्र आता ही मुदत १ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत छत्तीसगड सरकारकडून शिधापत्रिकांची पडताळणी सुरु आहे. छत्तीसगड राज्यातील अजूनही ६.४३ लाख लोकांची पडताळणी बाकी असल्याने सरकारकडून त्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
eKYC मोफत होत आहे
सरकारकडून शिधापत्रिका धारकांसाठी मोफत ई-केवायसी करून दिले जात आहे. यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही. राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय रास्त भाव दुकानांना ई-पॉस उपकरणांमध्ये ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे.
शिधापत्रिका धारकांना जर ई-केवायसी करायचे असेल तर त्यांना आधारकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार नाही.
अनेकांनी पडताळणी केली आहे
छत्तीसगड राज्यातील 2.66 कोटी लाभार्थ्यांपैकी 1.56 कोटी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात आली असून त्यापैकी 31.75 लाख लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तसेच राज्यातील प्रलंबित1.24 कोटी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अन्नधान्याचे सतत वितरण सुरू राहणार आहे.