Ration Card News : मस्तच! आता रेशन कार्ड नसले तरीही मिळणार मोफत रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:
Ration Card News

Ration Card News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच कमी दरामध्ये देखील धन्य रेशन कार्ड धारकांना दिले जाते.

कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून या मोफत धन्य वाटप योजनेची मुदत देखील वाढवली आहे. केंद्र सरकारकडून मोफत धान्य वाटप योजनेची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे सध्या रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. मोफत धान्य वाटपाचा लाभ घेईल असेल तर तुम्हाला रेशन वाटप दुकानात गेल्यानंतर तुमचे रेशन कार्ड दाखवावे लागायचे. मात्र आता तुम्ही विना रेशन कार्डशिवाय देखील रेशनचा लाभ घेऊ शकता.

मात्र आता केंद्र सरकार रेशनकार्ड नसतानाही मोफत रेशन देणार आहे. त्याच धर्तीवर देशातील अनेक राज्यांमध्ये आता मोफत धान्य दिले जात आहे. आता याअंतर्गत दिल्ली-एनसीआरमध्ये ‘वन नेशन, वन कार्ड’ योजना लागू झाल्यानंतर इतर राज्यांतील लोकांनाही मोफत रेशन मिळू लागले आहे.

जुन्या शिधापत्रिकेत नाव जोडून नवीन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे

सध्या देशामध्ये नवीन रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. तसेच रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदणी आणि नाव हटवण्याचे देखील काम सुरु आहे. तुमचे रेशन कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड

आता रेशन कार्ड धारकांना कार्ड नसले तरीही रेशन मिळणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत अन्नधान्याचे वितरण आता सर्व ई-पीओएसद्वारे केले जात आहे. दिल्ली सरकारकडून देखील हाच फॉर्म्युला वापरला जात आहे.

यासाठी मात्र तुमचे रेशन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला रेशन कार्ड नसताना देखील मोफत रेशनचा लाभ दिला जाईल. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकंना रेशन घेणे सोपे झाले आहे.

जर तुमची प्रकृती ठीक नसले किंवा तुम्ही रेशन घेण्याच्या वेळी तुमच्या घरी नसाल तर तुमच्या जागी तुमच्या कुटुंबातील सदस्य जाऊन रेशन घेऊ शकतात. त्यामुळे आता तुमचे रेशन बुडण्याची भीती नाही.

सध्या नागरिकांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार २०२४ पर्यंत मोफत रेशनचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. लोकसभा निवडणूक पाहता केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe