Ration Card : केंद्र सरकार गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा जनतेला फायदा होत असतो. तुम्ही आता केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊ शकता. समजा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन अनेक फायदे घेऊ शकता.
तसेच महिन्याच्या सुरुवातीला रेशनकार्डधारकांची नवीन यादी जाहीर केली आहे आणि या रेशनकार्डधारकांना विशेष सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्ही अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नवीन यादी कौटुंबिक उत्पन्न आणि सदस्य संख्येच्या आधारे तयार केली आहे. तसेच मनरेगामध्ये काम करणाऱ्यांचाही या यादीत समावेश केला आहे.
जाणून घ्या फायदे
केंद्र सरकारकडून देशातील कार्डधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ देत असून शासनाच्या या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल यासह अनेक गोष्टी लोकांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्यास तुम्ही देखील तुमचे रेशन कार्ड बनवू शकता.