पवार-मोदी भेटीनंतर राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मोदी आणि पवार यांच्या भेटीत आश्चर्यकारक असं काही नाही. पंतप्रधान मोदी यांनी पवारांसारख्या ज्येष्ठ खासदाराला भेटणं यात नवीन काही नाही. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत.

याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांवर लावलेले निर्बंध किती अडचणीचे ठरणार आहेत हे पवारांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

तसेच नवं सहकार खातं ज्यांच्याकडे आहे, अशा अमित शाह यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, असं पवार म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं. पवार आणि मोदी भेटीनंतर काही वेळातच संजय राऊत पवारांच्या भेटीला गेले होते.

तिथून ते एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले. यावेळी पवारांनी मोदी आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसंच सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अडचणी मोदींसमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा महाराष्ट्र आहे. इथं दबाव आणून काही होत नाही.

हे काही 30 आमदारांचं राज्य नाही. जिथे कुठले विचार नाहीत. दबावातून सत्तांतर होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात दबावातून सत्ताबदल होऊ शकत नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24