RBI Repo Rate Hike : RBI ने पुन्हा वाढवले रेपो दर, काय होणार सर्वसामन्यांवर परिणाम जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Repo Rate Hike : रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर होय. डिसेंबर महिन्यात आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. अशातच आता पुन्हा एकदा आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. आता बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे.

त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत आणि याचा थेट परिणाम कर्जदारांच्या ईएमआयवर झाल्याचेही आपल्याला दिसून येईल. दरम्यान आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यांसह उद्योगांवर होणार आहे.

दरम्यान अनेक तज्ज्ञांकडून रेपो दर वाढीचा अंदाज वर्तवला जात होता. या अगोदर, आरबीआयकडून डिसेंबर महिन्यात रेपो दर 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरबीआयने गेल्या वर्षीपासून रेपो दरात एकूण 2.50 टक्क्यांनी वाढ केली असून हा रेपो दर म्हणजे आरबीआय ज्या दरांवर बँकांना कर्ज देते त्या दरांचा संदर्भ होय.

तसेच हे लक्षात घ्या की रिव्हर्स रेपो रेट अंतर्गत, आरबीआय बँकांना त्यांचे पैसे ठेवण्यासाठी व्याज देत असते. जेव्हा RBI ने रेपो रेट कमी केला की कर्जाचा ईएमआय मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

आरबीआयच्या या निर्णयामुळे येत्या काळात सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. परंतु, गुंतवणुकीच्या बाजारावर कोणताही परिणाम दिसून आला नाही.