RBI चा मोठा निर्णय ! हॉलिडे असो अथवा रविवार तरी जमा होणार पगार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टम सर्व दिवस उपलब्ध राहणार असल्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज घोषणा केली आहे.

१ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही सिस्टम कार्यरत राहणार आहे. त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आता रविवार आणि बॅंक हॉलिडेसारख्या सुट्टीच्या दिवशीदेखील नोकरदारांचे पगार जमा होणार आहेत.

१ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर, वेतन, पेन्शन, विजबिले, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते इत्यादी सर्व बाबींची पूर्तता आता रविवारी,

बॅंक हॉलिडे आणि इतर सुट्टयांच्या दिवशीदेखील करता येणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना किंवा खातेधारकांनी ऑटो डेबिटची सुविधा ऑन केल्यानंतरही बॅंक हॉलिडे, सरकारी सुट्टया आणि रविवार या दिवशी ऑटो डेबिटची सुविधा अंमलात येत नव्हती.

त्यामुळे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नोकरदारांचे पगार जमा होत नव्हते. सुट्टीच्या दिवशीदेखील ऑटो डेबिट सुविधा कार्यरत राहणार नव्या नियमानुसार रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीदेखील ऑटो डेबिट सुविधा कार्यरत राहणार आहे.

त्यामुळे खातेधारकांना यापुढे ज्या दिवशी ऑटो डेबिट होणार आहे. तो दिवस रविवार किंवा सुट्टीचा असला तरीदेखील खात्यात बॅलन्स राखावा लागणार आहे. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24