अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांची फेरनिवड झाली.
महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) च्या कार्यकारी मंडळाची सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली.
यावेळी प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
१९९७ मध्ये अहमदनगर येथे पार पडलेले ७० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यामागे यशवंतराव गडाख यांचे मोलाचे योगदान राहिले.
अर्धविराम हे आत्मचरित्र, सहवास अंतर्वेध, माझे संचित, कवडसे ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. या पुस्तकांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांच्या अंतर्वेध या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार २०१२ मध्ये मिळाला.
साहित्य परिषदेवर विश्वस्त म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल साहित्यिक माजी खासदार गडाख यांचे अनेकांनी अभिनंदन केले.