पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे पुजा चव्हाण… या एका नावाने सध्या राज्यात वादळ उठविले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे आता याप्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता याच मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

पुण्यामध्ये मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन त्यांनी आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे.

तसेच सत्य समोर येईलच. पण, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावरही अन्याय होता कामा नये, अशीही भूमिका त्यांनी घेतली.  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

याआधी फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत, तसेच पत्र लिहून कारवाईची मागणीही केली आहे. त्यामुळे राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे

अहमदनगर लाईव्ह 24