अशी आहे कोरोनातुन बरे होण्याची जिल्ह्यातील रुग्नांची आकडेवारी जाणुन घ्या सविस्तर अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४१३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ६८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.०९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७ हजार ६७७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४९५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२८७ आणि अँटीजेन चाचणीत १०६४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७, अकोले ५०, जामखेड ८३, कर्जत ०२, नगर ग्रामीण २३, नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी ०६, राहता ०३, राहुरी ०४, संगमनेर १३८, शेवगाव १३७, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६०, अकोले २८, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव ५४, नगर ग्रामीण १७९, नेवासा ९८, पारनेर ९३, पाथर्डी ९४, राहाता १२५, राहुरी ४५, संगमनेर १०१, शेवगाव १०९, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ११८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०९, इतर जिल्हा ३१ आणि इतर राज्य ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०६४ जण बाधित आढळुन आले. मनपा ७३, अकोले ४९, जामखेड १७, कर्जत ५७, कोपरगाव ७३, नगर ग्रामीण ७४, नेवासा २१, पारनेर ६०, पाथर्डी १५४, राहाता ३३, राहुरी ६३, संगमनेर ६७, शेवगाव ३०, श्रीगोंदा २१४, श्रीरामपूर ६७, कॅंटोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६७४, अकोले १४५, जामखेड १०७, कर्जत २०५, कोपरगाव ३२१, नगर ग्रामीण ३५९, नेवासा २०१, पारनेर ३३३, पाथर्डी १६४, राहाता २६३, राहुरी २६२, संगमनेर २१०, शेवगाव २०५, श्रीगोंदा ४३६, श्रीरामपूर ६४, कॅन्टोन्मेंट ४८, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा १३५ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,९५,६८२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७६७७
  • मृत्यू:२४०४
  • एकूण रूग्ण संख्या:२,२२,११५
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24