अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अडीच लाख पार ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २०६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार ४६७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७० टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ४४२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५९७ आणि अँटीजेन चाचणीत ८९० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले १००, जामखेड ११५, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ६०, नेवासा ६३, पारनेर ६०, पाथर्डी २८, राहता ३८, राहुरी ०२, संगमनेर ७७, शेवगाव १५८, श्रीगोंदा ५३, श्रीरामपूर ०८, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, अकोले ०८, जामखेड ०८, कर्जत ८९, कोपरगाव २३, नगर ग्रा.२७, नेवासा ११, पारनेर १५, पाथर्डी ०४, राहाता २०, राहुरी ५९, संगमनेर ५४, शेवगाव ०४, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर १७१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८९० जण बाधित आढळुन आले. मनपा १०, अकोले ५१, जामखेड १२, कर्जत ४०, कोपरगाव ४५, नगर ग्रा. ४४, नेवासा ५२, पारनेर १२०, पाथर्डी ९८, राहाता २४, राहुरी ५७, संगमनेर १३९, शेवगाव ४१, श्रीगोंदा १०४, श्रीरामपूर ४७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२३, अकोले २०४, जामखेड ५२, कर्जत ६७, कोपरगाव १७२, नगर ग्रामीण २००, नेवासा १७४, पारनेर १२२, पाथर्डी २११, राहाता ९७, राहुरी १५१, संगमनेर १४७, शेवगाव ११९, श्रीगोंदा ७७, श्रीरामपूर ९२, कॅन्टोन्मेंट २३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर राज्य ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,३२,४६७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१५४४२
  • मृत्यू:२८७०
  • एकूण रूग्ण संख्या:२,५०,७७९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24