अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज २७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ४११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०८ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ७०० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११८५ आणि अँटीजेन चाचणीत ७६९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६४, अकोले ९५, जामखेड ४२, कर्जत ८८, कोपरगाव ६४, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३१, पारनेर १२, पाथर्डी ६४, राहता ५४, राहुरी ३१, संगमनेर १४, शेवगाव ४५, श्रीगोंदा ३६, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८२, अकोले ११, जामखेड १२, कर्जत १८, कोपरगाव ३८, नगर ग्रामीण १३५, नेवासा २९, पारनेर ३९, पाथर्डी २२, राहाता १३५, राहुरी ३६, संगमनेर ७७, शेवगाव १२, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ८३, कॅंटोन्मेंट बोर्ड १४ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ७६९ जण बाधित आढळुन आले. मनपा ३५, अकोले २७, जामखेड ३२, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ५५, नेवासा ५३, पारनेर ६६, पाथर्डी ११, राहाता ११२, राहुरी १५१, संगमनेर ५७, शेवगाव १४ श्रीगोंदा १००, श्रीरामपूर ३५, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६२२, अकोले ९०, जामखेड २७, कर्जत १५८, कोपरगाव ११२, नगर ग्रामीण २७२, नेवासा १८२, पारनेर १४५, पाथर्डी ९१, राहाता २०९, राहुरी १५०, संगमनेर १३९, शेवगाव १०८, श्रीगोंदा १०४, श्रीरामपूर २२५, कॅन्टोन्मेंट २०, मिलिटरी हॉस्पिटल ७० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.