भारतामध्ये आढळणारे प्राणीसंपदा ही खूप मोठ्या संख्येमध्ये असून यात वेगवेगळ्या प्राण्यांचे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. तसेच प्राण्यांमध्ये काही जमिनीवर राहणारे तर काही पाण्यात राहणारे तर काही पाणी आणि जमीन असे दोघं ठिकाणी राहणारे म्हणजेच उभयचर प्रकारातील प्राणी आपल्याला दिसून येतात.
तसेच काही प्राणी हे हिंस्र आणि मांसाहारी वर्गात येतात तर काही शाकाहारी वर्गात येतात. काही प्राण्यांचा आकार हा अगदी छोटासा असतो तर काही प्राणी हे प्रचंड मोठ्या आकाराचे असतात. अशा अनेक बाबतीत आपल्याला प्राण्यांमध्ये विविधता दिसून येते. यासोबतच काही प्राण्यांमध्ये काही इंटरेस्टिंग म्हणजेच मनोरंजक गोष्टी देखील असतात
व आपल्याला त्या माहीत नसतात. अगदी याच पद्धतीने आपल्याला हत्ती या सुंदर प्राण्याबद्दल सांगता येईल. हत्ती म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अवाढव्य आकाराचा आणि ताकदवान प्राणी डोळ्यासमोर येतो. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हत्तीला गणपतीचे रूप देखील म्हटले जाते.
अशा या हत्तीचे दातांचा विचार केला तर ते खूप महागडे असतात. यामध्ये आपण हत्तीचे दात पाहिले तर दोन सुळे आपल्याला दिसून येतात. परंतु हत्तीला फक्त तेवढे दोनच दात असतात का? की यापेक्षा जास्त असतात? हा प्रश्न आपल्याला जर पडला असेल तर याचे उत्तर आपण या लेखात घेऊ.
हत्तीचे दिसतात दोन दात परंतु खायचे असतात किती?
ज्याप्रमाणे माणसाला लहानपणी जे दुधाचे दात येतात ते कालांतराने पडतात आणि त्यानंतर दुसरे दात येतात. म्हणजेच साधारणपणे माणसाला आयुष्यामध्ये दोनदा दात येतात. परंतु या तुलनेत जर आपण हत्तीचा विचार केला तर याला त्याच्या संपूर्ण आयुष्यकालामध्ये सहा वेळा दात येतात.
जर आपण हत्तीच्या एकूण दातांचा विचार केला तर त्याला 26 दात असतात व आपल्याला पुढे जे दोन मुख्य दात म्हणजेच सुळे दिसतात त्यांना गजदंत असे म्हटले जाते. बाजारामध्ये हत्तीच्या या दातांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
हत्तीच्या दातांना मागणी असल्याचे प्रमुख कारण
हत्तीच्या दातांचा उपयोग प्रामुख्याने दागिने तयार करण्यासाठी केला जातो. हत्तीच्या दातांपासून गळ्यातला हार तर कानातले व बांगड्या देखील बनवल्या जातात. महिला वर्गाकडून हत्तीच्या दातांपासून जे दागिने बनवलेले असतात त्यांना खास मागणी असते. त्यामुळेच हत्तीचे दात हे महाग असतात.
त्यामुळे हत्तीच्या दातांची तस्करी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु जर कोणी हस्तीच्या दातांचा असा बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असेल तर हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यासंबंधी जर आपण कायदा पाहिला तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9 अंतर्गत हस्तीदंत म्हणजेच हत्तींच्या दातांचा बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई देखील केली जाते. यावरून आपल्याला हत्तीच्या दातांचे महत्त्व समजून येते.