अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या अनुषंगाने तपासादरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा बनावट माल राहाता तालुक्यातील कोल्हार येथील तीनचारी येथे लोणी पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आर. टी. एजन्सीज या नावाने हे दुकान सुरू होते. त्यामुळे गौतम हिरण यांच्या हत्येचे धागेदोरे कोल्हारमध्ये पकडलेल्या बनावट मालापर्यंत असण्याची शक्यता निर्माण होत आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून प्यादे पकडले वजीर केंव्हा हाती लागणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेवणनाथ गुलाब तायडे (वय ३१, रा. कोल्हार बुद्रुक, तीनचारी), दिपक शहाजेन (रा. गोंधवणी रोड, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे मॅन्युफॅक्चरींग नसलेले; मात्र सदर कंपनीचा बनावट लोगो व ट्रेडमार्क तयार करून तसेच हिंदुस्थानात युनिलिव्हर कंपनीच्या वरील मालाचे बनावटीकरन करून तयार केलेले
प्रॉडक्ट्स ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
बेलापूर येथील खून झालेले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे डिलर गौतम हिरण यांच्या खून प्रकरणाच्या अनुषंगाने तपासादरम्यान हे प्रकरण समोर आले. हा बनावट माल कुठून आला, कोण तयार करीत आहे,
याचा मुख्य सूत्रधार कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अरोपींकडून मिळण्याची शक्यता आहे. त्यामार्गे गौतम हिरण यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधारसुद्धा हाती लागू शकतो.
लोणी पोलिसांनी बनावट रॅकेट उद्ध्वस्त करून गुन्हेगारांना जणू इशारा दिला आहे. याबाबत लोणी पोलिसात हिंदुस्थान युनिलिव्हरचे मात्र अधिकृत उत्पादित नसलेले व बनावट नावाचा वापर करून तयार केलेले
क्लिनिक प्लस शॅम्पू पाऊच, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अधिकृत उत्पादन नसल्याचा संशय असलेले फेअर अँड लव्हली क्रिमचे पाऊच असा साडेतीन हजारांचा माल हस्तगत केला आहे.
याबाबत लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव व प्रभारी अधिकारी सपोनि समाधान पाटील करीत आहेत.