अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे लोक नवीन वर्षाच्या तयारीला लागले आहेत. येत्या 31 डिसेंबरला (31st december) लोक नवीन वर्षाचं स्वागत करतील आणि या वर्षाला निरोप देतील.
या आनंदाच्या सेलिब्रेशनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून मुंबईत पोलिसांनी जाहिर केलेली नवी नियमावली लागू होणार आहे.
त्यामुळे आधी नियम वाचा आणि मगच घराबाहेर पडा. मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा कोरोनाची नियमावली कठोर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांवर पालिकेचा वॉच असणार आहे. 100 भरारी पथकं यासाठी नेमण्यात आलीत. प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथकं नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.
हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पाटर्य़ांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहेत. यावेळी मास्क न घातल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड किंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई करणार आहेत.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत.
पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल. एकूण उपस्थितांची संख्या 1000 पेक्षा जास्त असल्यास, स्थानिक प्राधिकरणास कळवावे लागेल.
असं देखील या नियमावलीत नमुद करण्यात आलं आहे. दरम्यान, उद्यापासून सुरु होणारी नियमावली 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत जारी करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.