म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी वाचा ही महत्वाची माहिती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  आता देशात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरजीच्या आजाराने थैमान घातलं आहे. देशात वेगवेगळ्या भागात काळ्या बुरशीच्या आजाराचे आतापर्यंत 8,848 प्रकरण समोर आली आहेत.

तर 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

कोविड१९च्या काळात तसेच कोविडमधून बरे झाल्यानंतर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची तोंडात वाढ होते.

यामुळे सायनस, फुफ्फुसात आणि मेंदूमध्येही समस्या उद्भवतात त्यामुळे . दिवसातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ब्रश करुन तोंडाची काळजी घेतल्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया नियंत्रित करत येऊ शकतात.

त्यामुळे डॉक्टरांकडून तोंडाची स्वच्छता करणे देखील खूप उपयुक्त असल्याचा सल्ला दिला जातो. कोरोना मुक्त झाल्यानंतर जुन्या ब्रशवरील विषाणू पुन्हा हल्ला करू नये म्हणून रूग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्यावर टूथब्रश बदलण्याचा सल्ला देण्यात येतो.

काळ्या बुरशीसह कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी आपले तोंड नियमितपणे धुण्याचा सल्ला दिला जातो. टूथब्रश आणि टंग क्लीनर निर्जंतुक करा तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार कोविड संक्रमित रूग्ण किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले टूथब्रश कुटुंबातील अन्य सदस्य ठेवत असलेल्याच जागी ठेवू नये.

ते स्वतंत्र जागी ठेवावेत, अन्यथा यामुळे इतरांमध्ये विषाणू पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते.अँटीसेप्टिक माउथवॉश वापरुन, ब्रश आणि टंग क्लिनरद्वारे वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय .

अहमदनगर लाईव्ह 24