अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे.
मात्र तरीदेखील अनेकजण विनाकारण रस्त्यावरू येजा करत असतात. त्यांना याबाबत अनेकवेळा आवाहन करून देखील फरसा फरक नव्हता त्यामुळे मंगळवारी पाथर्डी तालुक्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली.
यात दोघेजण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये केली. तर इतरांना क्वारंटाईन केले. प्रशासनाच्या या कारवाईची माहिती समजताच सर्व रस्ते काही वेळातच निर्मुष्य झाले.
याबाबत सविस्तर असे की, लॉकडाऊन असताना देखील शहरातील अनेक रस्त्यांवर चांगलीच वर्दळ होती. ती आटोक्यात आणन्यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये असून त्यांच्याकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर आता धडक कारवाई केली जात आहे.
येथील स्व.वसंतराव नाईक चौकात चेक पोस्टवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून बेजबाबदार आढळून आलेल्या लोकांची रॅपिड अँटीजन कोरोना चाचणी करण्यात आली.
यामध्ये २५ लोकांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली, आत दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तेवीस जणांचे पुढील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येऊपर्यत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.